Monday 15 December 2014

' फास्ट लोकल '

एखाद्या ' फास्ट लोकल ' सारखं आहे माझं आयुष्य ! सुसाट …. आणि फास्ट लोकल कशी नेमक्याच स्टेशन्सवर थांबते तसच माझं ही काही आहे … माझ्या जीवनाची फास्ट लोकल फक्त  : ' सख्खे मित्र ' , ' संगीत ' , ' सिनेमा ' , ' चविष्ट खाणं ' , ' स्पोर्ट्स ' आणि ' लिखाण ' फक्त ह्याच स्टेशन्सवर थांबते …. ह्याच्या व्यतिरिक्त मी कुठे ही हॉल्ट  घेत नसतो …. आणि लोकल कशी मेंटेनन्ससाठी यार्डमध्ये जाते तसा मी स्वतःला रिचार्ज करून घेण्यासाठी, स्वतः मध्ये 'उत्साह' रूपी इंधन भरून घेण्यासाठी, स्वतःची दुरुस्ती करून घेण्यासाठी माझ्या लाडक्या सदगुरू "श्री अनिरुद्ध बापूंच्या " सानिध्यात जात असतो ….
ह्या आमच्या बापूंच्या यार्ड मध्ये स्वतः बापू कधी त्यांच्या प्रवचनातून तर कधी त्यांनी लिहिलेल्या अध्यात्मिक ग्रंथांमधून माझ्या थकलेल्या देहावर हळुवार त्यांच्या प्रेमाची फुंकार मारत असतात … बापू स्वतः M.D. Medicine असल्यामुळे व्याधीनवर इलाज करण हे त्यांचं  कामचं आहे …मग ती व्याधी शारीरिक असो वा मानसिक , ' मेरे बापू के पास हर मर्ज की दवा हे ' ' My Bapu Knows it All '
२००२ सालापासून बापूंकडे बरच काही शिकलो आणि आजही शिकत आहे …. पण सर्वात महत्वाची गोष्ट जी मी बापूंकडे आल्यापासून शिकलो ती म्हणजे ' चांगलं ' आणि ' वाईट ' ह्यांच्या मधला फरक …. आणि त्यामुळे आता जीवन जगतांना ' संभ्रम ' अवस्था नाहीशी झाली आहे …. मला कितीही हवी हवीशी वाटणारी गोष्ट जर बापूंनी सांगितलेल्या ' सत्य ' , ' प्रेम ' आणि ' आनंद ' व मर्यादा ह्या चौकटीत बसत नसेल तर ती माझ्यासाठी योग्य नाही हा सिद्धांत कायमचा मनात रुतला आहे … बापूंनी आम्हाला भगवंता वर खरं प्रेम कसं करायचं हे शिकवलं आणि त्या भगवंताला ही  माझ्याकडून फक्त प्रेमाशिवाय दुसरी कशाचीच अपेक्षा नसते हे शिकवलं ….
बापूंकडे येण्याच्या आधी ही माझी देवावर श्रद्धा होतीच पण आता फरक फक्त इतकाच आहे की मी देव्हार्‍यासमोर हात जोडून उभा राहून नुसता एखादं स्तोत्र पुटपुटत नाही तर त्या भगवंताशी प्रेमाने संवाद साधतो …. त्याचं गोजिरं रूप न्ह्याळत असतो.
आता माझी आयुष्यरूपी ' फास्ट लोकल '  ' भक्ती -सेवा ' नावाच्या स्टेशन वरून सुरु होते आणि ' सख्खे मित्र ' , ' संगीत ' , ' सिनेमा ' , ' चविष्ट खाणं ' , ' स्पोर्ट्स ' आणि ' लिखाण ' हे सर्व स्टेशन्स कव्हर करून माझ्या बापूंच्या यार्ड मध्ये जाऊन विसावते… माझ्या ह्या लोकलचा 'motorman' स्वतः माझा बापू आहे … जो माझ्या लोकलचा वेग नियंत्रित ठेवतो आणि कधी अडचणींचा रेड सिग्नल लागलाच तर अलगद माझ्या प्रवासाचा Track बदलतो पण कधी ही माझी लोकल रद्द करत नाही…थोडक्यात सांगायच झालं तर बापूंनी ह्या हर्षच जीवन हर्षभरित केलं आहे त्यांच्या लाभेवीणप्रीती मुळे ……………
चला तर येताय ना मग माझ्या संगे माझ्या ह्या  ' फास्ट लोकल ' मध्ये , आपल्याला मिळून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि प्रवास नुकताच सुरु झाला आहे …

2 comments:

  1. Not only Motorman but also the traffic controller and on His directions only u get green or red signal.... Beautifully expressed Harsh. Welcome to the blogosphere.

    ReplyDelete